Cloud Burst in Himachal : हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस; नागरिक जीव धोक्यात घालून पार करतात रस्ता - हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस
चंबा - हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच (heavy rain in himachal) आहे. चंबा जिल्ह्यातील सरोग गावात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे भूस्खलनामुळे भिंत कोसळली असून, त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे एका १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. किहारमधील दांड मुघल येथील भदोगा गावात रात्री उशिरा हा अपघात झाला. चंबा जिल्ह्यात रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे राखलू नाल्याजवळ चंबा तिसा रस्ता बंद झाला असून पाण्याचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे येथून जाणे धोक्याचे झाले आहे. तरीही नागरिक येथून आपल्या दुचाकीवरुन जाताना पहायला मिळत आहे. रस्ता ओलांडता यावा म्हणून काही लोक पाऊस थांबण्याची वाट पाहतात. मात्र काही लोक जीव धोक्यात घालून येथून जाताना दिसत आहे.