Pimpalgaon Toll Booth : दे दणादण ; टोलवरील महिला कर्मचारी आणि पोलीस पत्नीत तुंबळ हाणामारी - female staff
नाशिक पिंपळगाव टोल नाक्यावर टोल भरण्याच्या Pimpalgaon Toll Booth किरकोळ कारणावरून पोलीस पत्नी आणि टोल वरील महिला कर्मचारी तुंबळ हाणामारी Clash between female staff and police wife झाली. यावेळी महिले सोबत पोलीस पती देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपली पत्नी आणि दोन मुलांन समवेत पुणे येथे जात असताना बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर आपले शासकीय कार्ड दाखवत खाजगी वाहन सोडण्याची विनंती केली. शाब्दिक बाचाबाचीचे तुंबळ हाणामारीत रूपांतर टोलवरील महिला कर्मचारीने तुम्हाला टोल भरावाच लागेल, कार्ड चालणार नाही असे सांगितले. यानंतर पोलीस कर्मचारीने पैसे देऊन टोल भरल्यानंतर वाहनात बसलेली पोलीस पत्नी व महिला टोल कर्मचाऱ्यात शाब्दिक बाचाबाची ( Clash between female staff and police wife ) झाली. वाद विकोपाला गेल्याने दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारी झाली. काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकत वाद मिटवत सबुरीचा सल्ला दिला.