CM On Flood Situation : हिंगोलीतील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून घेतला आढावा - River Floods In Hingoli District
🎬 Watch Now: Feature Video
हिंगोली जिल्ह्यात नदीला पूर ( River Floods In Hingoli District ) आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना ही बाब कळताच त्यांनी दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना आवश्यक त्या सर्वा सुविधा पुरविण्याची सूचना केली. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली.