Dahi Handi Festival Dindoshi मानवी मनोऱ्याच्या तिसऱ्या थरावर अफजल खान वधाचा देखावा - वरळीच्या जांबोरी मैदानात भारतीय जनता पक्ष दहीहंडी उत्सव
मुंबई - वरळीच्या जांबोरी मैदानात भारतीय जनता पक्षाच्या BJP वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात दिंडोशी Dahi Handi Festival Dindoshi Mumbai येथील शिवसागर गोविंदा पथकाने सर्वांची मने जिंकली. या पथकाने जांबोरी मैदानातील दहिहंडी उत्सवात आधी सहा थरांची सलामी दिली. मात्र त्यानंतर तिसऱ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खान याचा Chhatrapati Shivaji Maharaj Afzal Khan killed scene केलेल्या वधाचा जिवंत देखावा या गोविंदा पथकाकडून सादर करण्यात आला. तिसऱ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या मिठीत दाबून मारण्याचा प्रयत्न करत असलेल्या अफजलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा कोथळा बाहेर काढला हे दृश्य दाखवण्यात आले.