Hanuman Birthplace Controversy : 'हनुमान जन्मस्थानाचा वाद निरर्थक, देशात शेतकरी, महागाई असे अनेक प्रश्न आहेत' - हनुमान जन्मस्थानाचा वाद
नाशिक - प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर आहे. प्रत्येक जण त्यांची पूजा करतो. कोणी कितीही म्हटले तरी पूजा करणे थांबणार आहे का? मंदिर, मशिद वाद वेगळा आहे. आता वाद करून अंजनेरी हे हनुमान जन्मस्थान आहे, यावर काय शिक्कामोर्तब होणार का? असं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. हनुमान जन्म कुठे झाला याने आता काय फरक पडणार, हा वाद निरर्थक आहे. देशात शेतकरी, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. कोणी कुठून ही महाराज आले तरी काय होणार आहे. आता तर राजकारणातच महाराज आहेत, असा टोला ही भुजबळ यांनी वाद करणाऱ्यांना लगावला.