महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शिंदेंच्या बंडावर काय म्हणाले वाईरकर यांचे कुटुंबीय, वाघाच्या चिन्हाची केली होती निर्मिती - एकनाथ शिंदे बंड वाईरकर कुटुंबीय प्रतिक्रिया

By

Published : Jun 25, 2022, 10:14 AM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठी ( Chandrakant Wairkar family on eknath shinde ) फूट पाडली आहे. त्यामुळे, राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. आता त्याच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात येत ( Chandrakant Wairkar family on shivsena ) असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे, ज्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी इतपर्यंत आणलेल्या शिवसैनिकाला याबद्दल काय वाटते, यासंदर्भात आम्ही परळ येथील शिवसैनिक ( chandu master family ) कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधला आहे. हे शिवसैनिक कुटुंब आहे ज्यांनी शिवसेनाच्या ध्वजावर दिसणाऱ्या वाघाच्या चिन्हाची निर्मिती केली. परळ येथील राहणारे चंदू मास्तर हे नाव देखील त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. त्यांचे संपूर्ण नाव चंद्रकांत वाईरकर. सध्याच्या राजकीय उलथापलथावर या कुटुंबीयांचे आणि शिवसैनिकांचे काय मत आहे हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतकडून करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details