Chandrakant Patil Criticized Uddhav Thackeray : 'मुख्यमंत्र्यांनी फक्त मंत्रालयात येऊ नये, तर महाराष्ट्र भर फिरावं', - चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे टीका
पुणे - गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरीच बसून जनतेला संबोधलं केले. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर फिरत होते. त्यांनंतर मुख्यमंत्री हे आजारी झाले. अन आत्ता अडीच वर्षाने मुख्यमंत्री हे मंत्रालयात यायला लागले आहे. ही बाब खूप स्वागतार्ह आहे आणि चांगली आहे. आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमान हातात घ्यावी आणि फक्त मंत्रालयात येऊ नये, तर राज्यभर फिरावं, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.