Neeraj Chopra success celebration: नीरज चोप्राच्या घरी आनंद साजरा; गाण्यांच्या तालावर महिलांचा ठेका - Women dance
हरियाणा - पानीपतमध्ये नीरज चोप्राच्या घरी आनंद साजरा करण्यात ( Neeraj Chopra success celebration ) येत आहे. घरातल्या तसच परिसरातल्या सर्व महलांनी गाण्यावर ठेका धरला ( Women dance ). यावेळी महिला स्वता गाणी म्हणत होत्या. टाळ्या वाजवून नीरज चोप्राच्या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. यूजीन, यूएसए येथे 18 व्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( World Athletics Championship ) नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या ( javelin throw ) अंतिम फेरीत ८८.१३ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नांसह रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू बनून इतिहास रचला आहे.नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल होता. दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने 82.39 मीटर, तिसऱ्या थ्रोमध्ये नीरजने 86.37 मीटर, चौथ्या प्रयत्नात नीरजने 88.13 मीटर फेक केली, तर पाचव्या फेरीत तो अपयशी ठरला. त्याचा पहिला फेक फाऊल घोषित करण्यात आला. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम कामगिरी ८८.१३ मीटर होती. दुसरे स्थान कायम राखत रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे.