Tiger CCTV Visuals : सुलतान बथेरी परिसरात वाघाचे थैमान; कुत्र्यांच्या पिल्लाला केले ठार, पाहा Video - वाघाचे सीसीटीव्ही व्हिडिओ
वायनाड (केरळ) : सुलतान बथेरी ( Sulthan Bathery ) येथील रहिवासी परिसरात भटकलेल्या वाघाने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार ( tiger attack on pet dog ) केले. याभागात वाघाने थैमान घातले आहे. तो दबा धरुन बसतो आणि हल्ला करुन कुत्र्यांना ठार मारतो. याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. वाघ कॉफीच्या मळ्यात फिरत होता यावेळी त्यांने एका कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याला ठार ( tiger killed dog ) मारले. यापूर्वी या परिसरात सांबर हरणाचे शवही अर्धवट अवस्थेत दिसले होते. सुलतान बथेरी येथे जंगली वाघांनी माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. सामान्यतः, वृद्ध किंवा जखमी वाघ सुलभ भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत भटकतात. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात वाघाचा शोध सुरू केला आहे.