Cat Head Stuck : दूध पिताना मांजरीचे तोंड गुंतले स्टीलच्या कॅनमध्ये; पुढे झाले असे काही, पाहा व्हिडिओ
नर्मदापुरम - मांजरीचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दूध पिताना मांजरीचे तोंड स्टीलच्या कॅनमध्ये अडकले ( Cat Head Stuck in milk box ). कोठी बाजार परिसरात राहणारे संदीप मिश्रा यांच्या घरातील दुधाच्या कॅनमध्ये मांजर दूध पीत होते. मग त्याचे तोंड कॅनमध्येच अडकले. जेव्हा मांजरीचे तोंड कॅनमधून बाहेर येत नव्हते, तेव्हा ती संपूर्ण खोलीत धिंगाणा घालत होती. आणि भिंतीवर डोके आपटत होती. सर्व प्रयत्न करूनही कॅनमधून मांजराचे तोंड निघत नसताना अखेर संदीप मिश्रा आणि आनंद चौकसे यांनी अथक परिश्रमानंतर मांजराचे तोंड कॅनमधून बाहेर काढले. त्यानंतर मांजरीने सुटकेचा नि:श्वास घेतला आणि तेथून पळ काढला. हे संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यादरम्यान लोकांनी एक व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. ( Cat funny video viral )