Accident Video : कार व कांद्याने भरलेल्या टेम्पोत धडक; नाशिक-औरंगाबाद महामार्गावर कांदाच कांदा - Accident Video
येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील भरवस फाटा येथे कार व कांद्याने भरलेल्या छोटा हत्ती वाहनाचा अपघात झाला. अपघातात छोटा हत्ती रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. यावेळी वाहनातील सर्व कांदे महामार्गावर पडले होते. येवला तालुक्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी विंचूर येथे जात असताना हा अपघात झाला, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली. तरी देखील या अपघातात शेतकऱ्याच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनातील कांदा पूर्ण रस्त्यावर परसला होता. ( Accident of tempo filled with onions )
Last Updated : Jun 3, 2022, 6:51 PM IST