मालवणच्या खाडीक्षेत्रात पिंजऱ्यातील मत्स्यक्रांती; पारंपरिक मासेमारीला 'केज फार्मिंग'चा पर्याय
मालवण तालुक्यातील तोंडवळी खाडीमध्ये तरंगणारे तराफे लक्ष वेधून घेतात. पाण्यावर तरंगणाऱ्या या तराफ्यांना पाण्यात पिंजरे बांधलेले आहेत. त्यात जिताडा माशाचे पालन केले जाते. पिंजऱ्यातील मत्स्य पालनाला 'केज कल्चर' फिश फार्मिंग म्हटलं जात. शासनाच्या कांदळवन विभागामार्फत कांदाळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना राबवण्यात येते. या योजनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केज कल्चर फिश फार्मिंगच्या माध्यमातून येथील खाडी क्षेत्रात नवी मत्स्य क्रांती उभी होत आहे.