Har Ghar Tiranga : बँड वाजवून पोलीसांनी केली हर घर तिरंगा अभियानाची जागृती,पिंपरी पोलीसांचा उपक्रम - Har Ghar Tiranga Abhiyaan
देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पुर्ण होत (75 years of Indian Independence) आहेत. म्हणून 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस (Indian Independence Day) अमृतमहोत्सव म्हणून अवघ्या देशभरात साजरा केला जातो आहे. 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाच्या (Har Ghar Tiranga Abhiyaan) माध्यमातुन नागरिकांमध्ये देशभावना निर्माण व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस (Activity of Pimpri Police) देखील पोलीस बँडसह नागरिकांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीसांनी बँड वाजवून (By playing the band the police) नागरिकांना प्रोत्साहित केले. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान देशाचा अमृतमहोत्सव साजरा केला जाणार असून; घरोघरी देशाचा मान, अभिमान तिरंगा पोहचवायचा आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिका अधिकाऱ्यांमध्ये लगबग दिसत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील कंबर कसली असून पोलीस बँड वाजवून त्यांनी नागरिकांमध्ये देशभावना जागृत (raised the awareness) करत आहेत. हेच पिंपरी-चिंचवड पोलीस शहरातील विविध भागात जाऊन अमृतमहोत्सवा निमित्त पोलीस बॅण्ड वाजवणार असून; लहानापासून मोठ्या पर्यंlच्या मनात देशभावना निर्माण करणार आहेत. या उपक्रमाच पोलीस अधिकाऱ्यांनी देखील स्वागत केले.