दिपाली चव्हाण यांच्या घरासमोर शिवकुमार व रेड्डींच्या पुतळ्याचे दहन
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज दिपाली चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानासमोर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्या पोस्टरला चपलांचा हार देखील घालण्यात आला.