Jahangirpuri Violence Video : जहांगीरपुरी अतिक्रमण 'जैसे थे' ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; घटनास्थळावरून प्रतिनिधीने घेतला आढावा
नवी दिल्ली - जहांगीरपुरीमध्ये ( Delhi Jahangirpuri ) अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एमसीडीच्या बुलडोझरने कारवाई सुरू केली असून अनेक अवैध दुकानेही जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यादरम्यान या भागातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. एमसीडीचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. यासोबतच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही घटनास्थळी तैनात आहे. ज्या ठिकाणी लोकांनी वर्षानुवर्षे अतिक्रमण केले होते. त्यावर बुलडोझर चालवला जात आहे. दिल्लीतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court of India ) जेवढे पाडकाम झाले आहे तेवढेच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर पुढील सुनावनी ही गुरुवारी होणार आहे.