महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Kashmiri Pandit case : कश्मीरी पंडितांशिवाय काश्मीरी संस्कृती अपूर्ण, बुखारी यांचं वक्तव्य

By

Published : Jun 12, 2022, 4:49 PM IST

Updated : Jun 12, 2022, 6:39 PM IST

काश्मिरी पंडितांशिवाय काश्मीरी संस्कृती ( Kashmiri culture ) कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असे वक्तव्य अपनी पार्टीचे अध्यक्ष सय्यद मोहम्मद अल्ताफ बुखारी यांनी केले. हे फक्त माझाच पक्षाचे मत नाही. तर,जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांचे मत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी पुणे दौऱ्यावर असताना पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला . पुढे बोलताना ते म्हणाले की, काश्मीर पंडिताशिवाय काश्मीर अपूर्ण आहे. काश्मीरमध्ये हिंदू काश्मीर, कश्मीरी पंडित, कश्मीर सीख, कश्मीरी मुसलमान सर्व एकत्र राहतात. त्याचबरोबर त्यांनी काश्मीर फाईल चित्रपटावर टिका केली आहे. काश्मीर फाईल ( Kashmir File Movies ) हा पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे. या चित्रपटात फक्त दिग्दर्शकाला जे दाखवायच होते तेच त्यांनी दाखवले. दुसरी बाजू त्यांनी दाखविली नाही, अशी टीका बुखारी यांनी केली.
Last Updated : Jun 12, 2022, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details