मुंबईत "ब्रेक द चेन" मोहिमेला सुरुवात.. तुरळक वाहतूक, रस्त्यांवर नागरिकांची संख्याही नगण्य - संचारबंदी लागू
मुंबईसह महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर "ब्रेक द चेन" मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसत आहे. नागरिकांचीही संख्या नगण्य अशी आहे. नाईट कर्फ्युचे नियम तोडले जाऊ नयेत, म्हणून मुंबईत पोलिसांची नियुक्ती केली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी.