Bollywood celebrities reached the cleanliness: जुहू बीचवर स्वच्छतेसाठी पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी - Juhu beach Mumbai
ढोल-ताशांच्या गजरात गणपतीचे विसर्जन मुंबईसह परिसरात जल्लोषात झाले. गेले 10 दिवस श्रीगणेशाची सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत गुलालाची उधळण करत गणपतीचे विसर्जन केले. मुंबईत दहा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर, मुंबईतील Juhu beach Mumbai जुहू बीच साफ करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले. दिव्याज व भामला फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच, मुंबई महापालिकेच्या सहकार्याने बॉलीवूड सेलिब्रिटींनी समुद्रकिनारी स्वच्छता केली. या अभियानात अनेक सिने कलाकार सहभागी Bollywood celebrities reached the cleanliness झाले होते. ज्यामध्ये ज्येष्ठ कलाकार अनुपम खेर, परणिती चोप्रा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता, आदी कलाकारांचा समावेश होता.