Boat Stuck In Fast Flow Of Ganga गंगा नदीत मोठी दुर्घटना टळली पाहा काय झालं व्हिडिओत
साहिबगंज - गंगा नदीत बुधवारी मोठी दुर्घटना टळली. एक होडी इंजिन बंद पडल्याने गंगा नदीच्या मधोमध अडकली. तेव्हा जोरदार वारे सुटल्याने नदीच्या मधोमध अडकलेली बोट वाऱ्याने पाण्याच्या प्रवाहात वर खाली होऊ लागली. त्यामध्ये काही लोक होते. मात्र, त्याचवेळी दुसरी होडी तिथे आल्याने लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी रणजीत मिश्रा यांनी सांगितले की, सध्या गंगा नदीच्या पाण्याची पातळी २६.२५ मीटरच्या धोक्याची रेषा ओलांडली आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत गंगा नदी ओलांडणे योग्य नाही, असे आवाहनही त्यांनी केलं ( Boat Stuck In Fast Flow Of Ganga ) आहे.
Last Updated : Aug 10, 2022, 9:09 PM IST