Mumbai Rain : पालिकेच्या उपाययोजनामुळे मुंबईकरांना दिलासा; पाण्याचा निचरा जलद गतीने - मुंबई पाऊस मराठी बातमी
मुंबई - मुंबईमध्ये सोमवार ( 3 जुलै ) पासून मुसळधार पाऊस पडत( Mumbai Rain ) आहे. यामुळे काल ( 5 जुलै ) अनेक सखल भागात पाणी साचले होते. मंगळवारी मध्यरात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला. यामुळे पुन्हा सखल भागात पाणी साचले. सकाळी पाऊसाने विश्रांती घेतली, तसेच पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, सायन आदी ठिकाणी पाणी साचते. पालिकेने गेल्या काही वर्षांत उभारलेले पंपिंग स्टेशन, पाणी उपसा करण्यासाठी लावलेले पंप आणि हिंदमाता, मिलन सब वे येथे बनवण्यात आलेल्या भूमिगत टाक्या यामुळे पाण्याचा निचरा जलद गतीने झाला आहे. यामुळे पाऊस पडला तरी मुंबई थांबलेली दिसलेली नाही.