Mumbai Dahi Handi मुंबईत दृष्टिहीन तरुणांनी दिली चार थरांची सलामी, पाहा VIDEO - मुंबई दहीहंडी मराठी बातमी
मुंबई - मुंबई-ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह सगळीकडेच पाहायला mumbai dahi handi 2022 मिळतोय. तरुणांसोबत तरुणीही तेवढ्याच मोठ्या उत्साहात या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले आहेत. मुंबईच्या जांबोरी मैदानात दिवसभरात शेकडो दहीहंडी उत्सव मंडळ सहभाग घेत असतात. मात्र, आज ( 19 ऑगस्ट ) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दृष्टिहीन तरुणांच्या दहीहंडी उत्सव मंडळाने. नयन फाउंडेशनच्या वतीने दृष्टिहीन तरुणांचं हे मंडळ मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवात सहभागी होत आहे. दृष्टिहीन असूनही तरुण-तरुणींना लाजवेल असा उत्साह या तरुणांमध्ये पाहायला मिळाला. जांबोरी मैदानात चार थरांची सलामी देत या गोविंदा पथकाने आपल्या आजच्या दिवसाचा आरंभ blind boys thrill dahi handi in mumbai केला.