आपल्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा, मतांची जुळवाजुळव सुरू; सदाभाऊ खोत यांची 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया - सदाभाऊ खोत विधान परिषद निवडणूक
मुंबई - 20 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) अपक्ष म्हणून शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot Independent Candidate) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला तरी आपल्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. निवडून येण्यासाठी मतांची जुळवाजुळव आमच्याकडून केली जाईल. सर्वच पक्षातील आमदार हे शेतकरी कुटुंबातले आहेत. तसेच माजी आमदार शेतकरी कुटुंबातील नाहीत. मात्र त्यांच्यात आता दोन वेळचे अन्न हे शेतकऱ्यांमुळं येते याची जाण त्या आमदारांना आहे. म्हणून निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे आमदार आपल्या बाजूने मतदान करतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला. तसेच गेले तीस वर्षात आपण शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी अनेक आंदोलने केली. नुकतेच एसटीच्या आंदोलनाला देखील यश मिळाले आहे. त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळेल असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.