Maharashtra Cabinet Expansion : दोन अडीच वर्षांचा बॅकलॉग शिंदे-फडणवीस सरकार भरून काढणार - रविंद्र चव्हाण - मंत्रिमंडळ विस्तार
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची ३० जूनला शपथ घेतली. सरकारचा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला. विरोधकांची शिंदे - फडणवीस सरकारवर यावरून टीका सुरू होती. आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. येणाऱ्या काळात दोन अडीच वर्षाचा बॅकलॉग शिंदे फडणवीस सरकार भरून काढेल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित मंत्री भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.