Kirit Somaiya On CM : उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बाराव्यांदा थप्पड लगावली - किरीट सोमैया यांचे टिकास्त्र - किरीट सोमैया यांची उद्धव ठाकरेंवर टीका
पुणे - उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बाराव्यांदा थप्पड मारली आहे. असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केले आहे. ते आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे सरकार हे माफिया सरकार असून या सरकारला गुंडांसारखे राज्य करायचे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी दाऊदच्या अजेंटला मंत्रिमंडळात ठेवलं होते असे किरीट सोमैया यांनी मत व्यक्त केले. परंतु महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता या माफिया सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही आणि म्हणूनच शिवसेनेच्या बोक्याला जो स्वतःला वाघ समजतो अशा संजय राऊतला देखील कोर्टाने जोरदार थप्पड लगावली आहे. येत्या 4 जुलैला संजय राऊतला न्यायालयात हजर राहावे लागणार असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांचे रक्षण करण्याचे काम सध्या माझ्याकडे आहे. असे म्हणत ते पूर्ण होईपर्यंत मला दुसरी कोणतीही जबादारी नको असे ही भाजप नेते किरीट सोमैया यांनी सांगितले.