Devendra Fadnavis on Sharad Pawar : शरद पवारांच्या टिकेला देवेंद्र फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले... - शरद पवार यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
राज्यात राष्ट्रपती राजवट ( Sharad Pawar on president rule ) लागू करता येईल अशी परिस्थिती आहे, असे भाजपच्यावतीने सांगण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar on devendra fadnavis in pune ) यांना विचारले असता, हे खरे आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हा काही नवीन भाग नाही. सगळेच शरद पवार नसतात. माझी कित्येकदा सरकार गेली. पण, मी कधीही अस्वस्थ झालो नाही, असा टोला शरद पवार ( Sharad Pawar attack on devendra fadnavis ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तर देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यात सुरू असलेल्या गोंधळावर ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.