Devendra Fadnavis : 'मुख्यमंत्री ठाकरे आणि माझ्या बायकोत एकच साम्य...'; फडणवीसांचे मिश्कील उत्तर - अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
नागपूर - राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगले गातात, असे मला आदित्यने सांगितले होते. कारण मला वाटले आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीसांना लगावला होता. त्यावर अमृता फडणवीसांना ठाकरेंच्या मेहुण्याची चेष्टा केली होती. मुख्यमंत्री ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात रंगलेल्या शाब्दिक फैरीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'उद्धव ठाकरे ( Devendra Fadnavis On Cm Uddhav Thackeray ) आणि माझी बायको अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाही आणि माझी बायको नको त्या गोष्टींना उत्तर देणे सोडत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्री पदाची गरिमा ठेवली पाहिजे. माझ्या पत्नीला सुद्धा नको त्या गोष्टींना उत्तर देण्याची गरज नाही,' असे फडणवीसांना स्पष्ट केले ( Devendra Fadnavis On Amruta Fadnavis ) आहे.