Kolhapur North By Election : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील जनतेचा कौल मान्य - चंद्रकांत पाटील - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक बातमी
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा ( Kolhapur North By Election ) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते 41 हजारांवरून वाढून 78 हजार झाली आहे. जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवाय नाना कदम लढले तरी तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो असतो तर काय होईल, असा टोलाही पाटलांनी महाविकास आघाडीला लगावला ( Chandrakant Patil Reaction On Kolhapur By Election ) आहे.