BJP Celebration In Pune : राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा पुण्यात जल्लोष - धनंजय महाडिक
पुणे :मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या ( Rajya Sabha Election ) मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने ( Shivsena ) सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार ( Sanjay Pawar ) यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक ( Dhanjay Mahadik ) यांचा विजय झाला आहे. राज्यसभेत मिळालेल्या यशाबद्दल पुण्यातील कसबा गणपती बाहेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष ( BJP Celebration ) करण्यात आला. ये तो अभी झाकी है विधानपरिषद बाकी है..आत्ता कसं वाटतंय..अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भारतीय जनता पक्षाच्या जल्लोषाचा आढवा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने.