Video : राष्ट्रपतींबद्दल अपशब्द काढल्याने नागपुरात भाजप आक्रमक; अधीर रंजन यांचा पुतळा जाळला - अधीर रंजन यांचा पुतळा जाळला
नागपूर - देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबद्दलला काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी अपशब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले ( BJP Aggressive in Nagpur on Insulting Word on President ) आहेत. नागपुरात अधीर रंजन यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. नागपूरच्या आदिवासी गोंड राजे बुलंदशाह चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या राष्ट्रपती बद्दल असे वक्तव्य करणाऱ्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकरी, युवा मोर्च्याच्या शिवानी दाणी यांच्यासह अनेक पदाधिकरी होते. भाजपा युवा मोर्चाकडून अचानकपणे प्रतिकात्मक पुतळा आणून जाळण्यात आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी जळतांना पुतळा हिसकावून ( effigy of Adhir Ranjan Chaudhary was burnt ) घेतला.