अबब..! नागपुरातील 'या' मंदिरात हनुमान जयंती निमित्त लाखो भाविकांसाठी केला जातो प्रसाद - टेकडी लाईन हनुमान मंदिर नागपूर
नागपूर - नागपुरात टेकडी लाईन हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या ठिकाणी लाखो भाविकांसाठी हनुमान जयंती निमित्त प्रचंड प्रमाणात प्रसाद ( Prasad tekdi line hanuman temple Nagpur ) केला जातो. या लाखो भाविकांसाठी हजारो किलो भाज्या, पोळ्या आणि प्रसाद शिजवला जातो. यासाठी साधारण एक ते दीड महिण्यांपासून तयारी केली जाते. मागील दोन वर्षांपासून हा कर्यक्रम होऊ शकला नसला, तरी यंदा मोठ्या उत्साहात झाला असून 35 वर्षांपासूनची मंदिराची परंपरा कोरोनाच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे. प्रसादासाठी दहा हजार किलो भाजी, पंधराशे किलो शुद्ध मिठाई शुद्ध तुपाचा उपयोग करून केली जाते. पाच हजार किलो कणकीच्या पोळ्या, दोन हजार किलोचा भात, दोन हजार लिटर मठ्ठा बनवला जात असतो. मात्र, भोजन बनवत असताना कांदे आणि लसूनचा कुठेही उपयोग केला जात नाही. या ठिकाणी एक ते दीड लाख लोक या प्रसादाचा लाभ घेत असतात.