महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

World Bicycle Day : जागतिक सायकल दिनानिमित्त स्मार्ट सिटीतर्फे 'सायकल रॅली'; अनेकांनी घेतला सहभाग, पाहा व्हिडिओ - नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर

By

Published : Jun 3, 2022, 7:52 PM IST

World Bicycle Day : नागपूर - नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आज जागतिक सायकल दिनानिमित्त "इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज-२" अंतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने 'सायकल राईड'चे ( Bicycle Rally by Smart City ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर., मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह शेकडो नागरिक या सायकल रैल्लीत सहभागी झाले होते. दीक्षाभूमी येथून निघालेल्या सायकल रॅलीला भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी हिरवी झेंडी दाखवली, यावेळी त्यांनी सायकल दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देत सर्वांनी निरोगी राहण्यासाठी सायकलीचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनीही जनतेला नेहमी सायकल चालविण्याचे आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details