महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bhai Jagtap on vidhan parishad election : खूप खालच्या दर्जाचे राजकारण केलं जातंय - काँग्रेस नेते भाई जगताप - vidhan parishad election candidate Bhai Jagtap

By

Published : Jun 20, 2022, 11:01 AM IST

मुंबई - गणित सगळी आघाडीच्या बाजूने. संध्याकाळी ( Bhai Jagtap on vidhan parishad election ) निकाल समोर येईल. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. एकमेकांचा आदर ठेवला जायचा. राजकारण खूप खालच्या दर्जाचे केले जात आहे. निवडणूक जिंकणारच, असा विश्वास विधान परिषदेचे उमेदवार तथा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी व्यक्त केला. विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज ( सोमवारी ) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ११ उमेदवार रिंगणात असून गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi In MLC Election ) आणि विरोधीपक्ष भाजपाची ( BJP In MLC ) उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र पाडापाडीचे राजकारण रंगणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details