Beating the Retreat ceremony : दिल्लीत 'बीटिंग द रीट्रिट' सोहळा उत्साहात संपन्न, पाहा व्हिडिओ - बीटिंग द रीट्रिट
नवी दिल्लीतील विजय चौक येथे 'बीटिंग द रीट्रिट' सोहळा पार पडला. ‘बीटिंग द रिट्रीट’ची (Beating Retreat) परंपरा शतकानुशतके जुनी आहे. 17 व्या शतकात इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. आज पार पडलेल्या 'बीटिंग द रीट्रिट' सोहळ्यात जवानांचा उत्साह आणि देशभक्तीचे दर्शन दिसूनआले. नवी दिल्लीच्या ऐतिहासिक विजय चौकात आज सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा पार पडला. या सोहळ्यात पहिल्यांदाच ड्रोन प्रदर्शन, या वर्षीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक होते. 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ उत्सवाचा एक भाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासग अनेक मंत्री व उच्च पदस्थ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत या प्रदर्शनाची संकल्पना आणि रचना, निर्मिती आणि नृत्यदिग्दर्शन करण्यात आले.