महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mla Rajendra Raut : आमदार राजेंद्र राऊत यांनी लगावली कार्यकर्त्यांच्या कानशिलात; पाहा व्हिडीओ - आमदार राजेंद्र राऊत यांनी लगावली कार्यकर्त्यांच्या कानशिलात

By

Published : May 29, 2022, 5:12 PM IST

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील आमदार राजेंद्र राऊत नेहमी चर्चेत असतात. नुकतीच एक घटना घडली आहे. बार्शी येथे क्रिकेट सामान्यवेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली ( Mla Rajendra Raut Slapped Man )आहे. विशेष म्हणजे हा कार्यकर्ता आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी स्टेजवर आला होता. बार्शी येथे एका क्रिकेट सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र राऊत आले होते. स्टेजवर येऊन आमदार यांना सन्मानाने कार्यकर्ते नमस्कार करत होते. तर कोणी कार्यकर्ते आदराने पाया पडत होते. मात्र, एक कार्यकर्ता आला आणि राजेंद्र राऊत यांना दंडवत घातला. मात्र, तेव्हा राऊत यांना अज्ञात कारणाने राग आला आणि त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राऊत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details