Banner Hoisting In Pune : पुण्यात चर्चा रंगली त्या बॅनरची...काय ते रस्ते,काय ती घरपट्टी आणि काय ती स्मार्ट सिटी.... - संजय बालगुडे
शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील ( MLA Shahaji Bapu Patil ) यांचा गुवाहटी येथील तो डायलॉग आज सर्वत्र प्रसिद्ध दिसत आहे. त्यांच्या या डॉयलॉगवरून पुण्यात बॅनरबाजी ( Banner Hoisting In Pune ) करण्यात आली आहे. त्याची चर्चा आत्ता शहरभर होऊ लागली आहे. पुणे महापालिकामध्ये 5 वर्ष भाजपची सत्ता होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी भाजपला टोला लगावत ही बॅनर बाजी केली आहे. काय ते रस्त्यावरचे खडे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणी पट्टी वाढ, काय ती सम्राट सिटी, काय तो घोटाळा अशाप्रकारचे बॅनर सध्या पुण्याच्या स्वारगेट परिसरात झळकलेले पहायला मिळत आहेत.