महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Auto Driver Modi Fan केजरीवालांना जेवायला बोलावणारा ऑटो रिक्षाचालक निघाला पंतप्रधान मोदींचा चाहता - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

By

Published : Sep 30, 2022, 7:50 PM IST

अहमदाबाद : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) काही आठवड्यांपूर्वी गुजरात दौऱ्यावर आले होते. त्यावेळी गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या ऑटो चालक विक्रम दत्तानी याने त्याला आपल्या घरी जेवायला बोलावले होते. त्याचे आमंत्रण स्विकारुन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याच्या घरी जेवायला (WHO HAD DINNER WITH ARVIND KEJRIWAL) गेले. या घटनेच्या 17 दिवसानंतर विक्रम दत्तानी याने भाजपचा भगवा धारण केला आहे. एवढेच नव्हे तर ते, भगवे कपडे परिधान करून पीएम मोदींच्या सभेला (AUTO DRIVER TURNED OUT TO BE MODI FAN) आला होता. या प्रकरणाबाबत विक्रम दत्तानी म्हणाले की, अरविंद केजरीवाल जेव्हा गुजरात दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पण मी भाजपला मत देत आहे. मी पूर्वीपासून भाजपशी संबंधित आहे. माझा संपूर्ण समाज भाजपला मत देतो. अरविंद केजरीवाल आमच्या घरी जेवायला आले तेव्हा, लोक मोठ्या संख्येने आले होते. पण, तो जेवणाचा कार्यक्रम माझा स्वत:चा आयोजित केलेला नसुन,तो ऑटो ड्रायव्हर्स युनियन ने आयोजित केला होता. त्यामुळे मला केजरीवाल यांना जेवायला बोलावणे भाग पडले. अरविंद केजरीवाल यांच्या रात्रीच्या जेवणानंतर माझी व त्यांची पक्षाशी संबंधित कुठलीही चर्चा झाली नाही. आम्हाला गरज पडली की भाजप सरकार व भाजपचे कार्यकर्ते मध्यरात्री कामी येते. जेव्हा जेव्हा भाजप सरकारला माझी गरज असते, तेव्हा मी पण तयार असतो. असे बोलुन ऑटो चालक विक्रम दत्तानी यांनी मी आप पक्षाचा नसुन, भाजप पक्षाचा खंदा समर्थक असल्याचे सिध्द केले.

ABOUT THE AUTHOR

...view details