VIDEO : देहूत पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी, आकर्षक फुलांनी सजले तुकाराम महाराजांचे मंदिर - तुकाराम महाराज मंदिर देहू
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार आहेत. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या आतमध्ये देखील आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिळा मंदिरातील सजावट पाहूया.
Last Updated : Jun 14, 2022, 10:57 AM IST