Jalna Crime News : शुल्लक वादातून जालन्यात भरदिवसा अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न - जालन्यात अंगावर पेट्रोल टाकून पेटवले
जालना - जालन्यात शुल्लक वादातून भरदिवसा एका इसमाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. या घटनेत संबंधित इसम पन्नास टक्के भाजला असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील टाऊन हॉल भागात सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी या वादाचे पर्यावसान पेट्रोल अंगावर टाकून पेटवून देण्यात झाले. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तुकाराम मंडाळ इमारतीच्या वाहन पार्किंगमध्ये खुर्चीवर बसून तेथील कामगारांसोबत चर्चा करत होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या सुरज संजय देशमुखने तुकाराम मंडाळ यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी मंडाळ यांना लागलेली आग विझवली. आणि तातडीने औरंगाबाद येथे रुग्णालयात हलविले. दरम्यान याप्रकरणी सुरज देशमुख याच्याविरोधात कदीम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Attempts to burn by throwing petrol on body in jalna )