महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Infestation Of Larvae On Maize : उन्हाळी मक्यावर लष्करी अळीचे आक्रमण; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, Video - Infestation Of Larvae On Maize

By

Published : Apr 20, 2022, 6:18 PM IST

Updated : Apr 20, 2022, 7:03 PM IST

येवला (नाशिक) - येवला तालुक्यात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यावर्षी तालुक्यातील शेतकरी वर्गाने उन्हाळी मकाची लागवड केली ( Infestation Of military Larvae on summer maize ) आहे. मात्र या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने या अळीने संपूर्ण पिकातील पाने कुरतडून टाकली जात असल्याचे दिसून येते असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. लष्करी अळीने पिकांची वाढ खुंटली - तालुक्यातील शेतकरी वर्गाने सुमारे सव्वाशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मकाची लागवड केली आहे. मात्र या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांचा नुसता सापळा झाला आहे.गेल्या एक दीड महिन्यांपासून विजेचाही खेळखंडोबा झाल्याने असल्याने मका उत्पादक शेतकरी पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी देता येत नसल्याने पीक सुकू लागले आहे.त्यात आळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीकाची वाढ खुंटल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास परत एकदा हिसकवला जात आहे.
Last Updated : Apr 20, 2022, 7:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details