महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Abdul Sattar supporter : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच सिल्लोडमध्ये जल्लोष - Happiness in Sillod

By

Published : Jul 1, 2022, 2:40 PM IST

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde as Chief Minister ) यांच्या नावाची घोषणा होताच सिल्लोडमध्ये ( Happiness in Sillod ) शिवसेना तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थकांच्या ( Abdul Sattar supporter ) वतीने जल्लोष करण्यात आला. शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय तसेच प्रियदर्शनी चौक येथे फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशे वाजवून व एकमेकांना लाडू-पेढा भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. शपथविधी पाहता यावा यासाठी प्रियदर्शनी चौकात भव्य स्क्रीन लावण्यात आला होता. शपथविधी होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. या जल्लोष सोहळ्यात शिवसैनिकांनी हातात भगवे झेंडे तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, मंत्री एकनाथ शिंदे व अब्दुल सत्तार यांचे छायाचित्र असलेले फलक घेतलेले होते. "जय भवानी, जय शिवाजी" तसेच एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details