महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Women Arogyawari Pune : महिला आयोगाच्या वतीने वारकरी महिलांसाठी 'आरोग्यवारी' - आषाढी वारी 2022

By

Published : Jun 19, 2022, 3:15 PM IST

पुणे - सोमवारपासून ( 20 जून ) सुरू होणाऱ्या पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरीता राज्य महिला आयोगाच्या वतीने 'आरोग्यवारी' उपक्रमाचा ( Women Arogyawari Pune ) शुभारंभ करण्यात आला. पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्या हस्ते हा शुमारंभ करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाला, वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करणे, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देणे, आदी सुविधा या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात असल्याची रुपाली चाकणकरांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details