मानधनवाढीसाठी राज्यभरात 'आशा' कर्मचाऱ्यांचे आंदोलन... - asha workers agitation
मुंबई - अनेक वर्षापासूनच्या मानधनवाढीच्या आपल्या मागण्यांकरिता आशा सेविकांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरूच आहे. तर, दिवसेंदिवस आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र रूप धारण करत आहे. आशा वर्कर यांना अत्यल्प वेतन मिळत असून गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी अनेक आंदोलने केली. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले. यातच गेल्या दोन महिन्यांपूर्वी आशांची वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक झाली होती. या बैठकीत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आशा वर्कर यांचे वेतन तिप्पट करू असे आश्वासन दिले होते. पण दोन महिने उलटूनही अद्याप वेतन वाढीचा निर्णय सरकारने घेतला नाही. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करण्याचा ध्यास आशा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याच अनुशंगाने घेऊया त्याचा धावता आढावा...