Sai Resort Demolished : अनिल परब यांचा साई रिसाॅर्ट पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग - Sea Kanch Resort Dapoli
रत्नागिरी - दापोलीतील वादग्रस्त साई रिसाॅर्ट ( The controversial Sai Resort in Dapoli ) प्रकरणी पर्यावरण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग ( Fund class from Environment Department to Collector ) करण्यात आला आहे. अशी, माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या ( Information BJP leader Kirit Somaiya ) यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे साई रिसाॅर्ट, सी काॅन्च रिसाॅर्ट पाडण्यासाठी निधीसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडून दोन्ही रिसाॅर्ट पाडण्यासाठी देण्यात आला निधी १ कोटी १ लाख २५ हजार रुपये पर्यावरण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आल्याचे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.