Video : निर्दयी मुलाने केली आईला मारहाण.. सेप्टिक टॅंकमध्ये दिले फेकून.. 'असे' आहे कारण - शौचालय बांधण्यावरून मुलाने आईवर केला हल्ला
पालनाडु ( आंध्रप्रदेश ) : पालनाडू जिल्ह्यातील ( Palnadu District Andhra Pradesh ) क्रोसुरू मंडळाच्या गुढीपाडू गावात एका मुलाने स्वतःच्या आईलाच मारहाण करत शौचालयासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात फेकून ( Son Attacked Mother Over Toilet Construction ) दिले. एका मुलाने आईकडे न बघता तिच्यावर अमानुष हल्ला केला. आई आश्रबी यांनी त्यांच्या जागेवर शौचालय बांधण्याचे काम हाती घेतल्याने त्यांचा मुलगा इसुबुने संताप व्यक्त केला. न राहवून त्याने आईवर हल्ला केला आणि तिला शौचालयासाठी बनवलेल्या सेफ्टीक टॅंकमध्ये फेकून ( Son Throwed Mother In Septic Tank ) दिले. त्याला थांबवणाऱ्या इतर कुटुंबीयांनाही त्याने धमकावले. आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध म्हणून आई आश्रबीने त्याच खड्ड्यात आंदोलन केले. तिने आपल्या मुलापासून वाचवण्याची मागणी केली आहे.