नांदेड जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - कोरोना अपडेट
नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. परराज्यातील आणि जिल्ह्यातील वाहनांना बंदी करण्यात आली आहे. संचार बंदीच्या काळात घराबाहेर पडू नका, नियमांचे पालन करा, कोरोना संसर्गावर घरी राहणे हाच पर्याय आहे, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले.