Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयाला दान-धर्माला का आहे विशेष महत्व?; पाहा, VIDEO... - अक्षय्य तृतीया मराठी बातमी
नाशिक - वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया ( Akshaya Tritiya 2022 ). या मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी केलेले केलेले दान-धर्म पूजा-अर्चा हे आपल्याला अक्षय्य फळ देतात. त्याच दिवशी त्रेतायुगाला सुरुवात झाली होती. या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. आपला धनसंचय हा अक्षय्य व्हावा म्हणून या दिवशी सुवर्ण खरेदी केली जाते. तसेच, या दिवशी पितरांना मोक्ष मिळावा, त्यांना सद्गती मिळावी म्हणून असलेल्या ऋतू फळ आणि माठ आदींचे दान करण्यात येत. त्यातून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेतले जातात.