महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ajit Pawar On Raj Thackeray : 'बोलणाऱ्याचे जेवढे वय, तेवढे पवार साहेबांचे राजकारणातील आयुष्य'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला - yeola Shivsrushti project bhumi pujan

By

Published : May 3, 2022, 7:30 AM IST

Updated : May 3, 2022, 7:54 AM IST

येवला (नाशिक) - येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन ( Shivsrushti project bhumi pujan ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या शुभहस्ते तर मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बोलणाऱ्याचे जेवढे वय आहे, तेवढे शरद पवार साहेबांचे राजकारणातील आयुष्य आहे. असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला ( Ajit Pawar On Raj Thackeray ) आहे. ते म्हणाले की, लोकांच्या मनामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताच काही लोकांना भोंगे का आठवत आहेत. कशा करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पवार साहेबांनी सर्व समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे. त्यांना जातीयवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत बोलणाऱ्याचे वय जेवढा आहे. तेवढे पवार साहेबांची राजकिय कारकीर्द असल्याचा चिमटा त्यांनी राज ठाकरे यांना काढला.
Last Updated : May 3, 2022, 7:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details