Owaisi to visit Ranchi: ओवेसी यांचा रांची दौरा! विमानतळावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने खळबळ - AIMIM chief Owaisi Ranchi Tour
रांची - मंदार पोटनिवडणुकीत भाजपचे बंडखोर नेते देवकुमार पॅडी यांच्या प्रचारासाठी AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी रांची दौऱ्यावर आहेत. AIMIM'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित होते. असदुद्दीन ओवेसी रांचीमध्ये पोहोचताच कार्यकर्त्यांनी झिंदाबादच्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. दरम्यान, तेथेच ओवेसी झिंदाबादच्या घोषणांदरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाही ऐकू आल्या. ( Owaisi to visit Ranchi ) ओवेसी यांच्या एका समर्थकाने ही घोषणा दिल्याचे समजते. मात्र, ही घोषणा कोणी दिली याबद्दल काही माहिती समोर आली नाही. आता या घोषणेमुळे ओवेसी यांचा हा निवडणूक दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे.
Last Updated : Jun 19, 2022, 5:00 PM IST