Agnipath Scheme Protest : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या नरेशने 60 किमी धावत नोंदवला निषेध
भारतीय सैन्यात भरतीसाठी केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेबाबत ( Agnipath Scheme ) देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत असतानाच, ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातून आंदोलनाचे अनोखे चित्र समोर आले आहे. खरं तर, सैन्य भरतीची तयारी करत असलेला नरेश विश्वास ( Naresh Vishwas ) (23) याने निषेध म्हणून शुक्रवारी नबरंगपूर जिल्हाधिकारी कार्यालय ते उमरकोटमधील बिजू पटनायक स्टेडियमपर्यंत 60 किमी धाव ( Ran 60 km ) घेतली. त्याने ही शर्यत पाच तास 26 मिनिटांत पूर्ण केली. नरेश म्हणाला की, जवळपास 20 तरुण त्याच्यासोबत सैन्य भरतीची तयारी करत आहेत. केवळ चार वर्षे काम करण्याची आमची तयारी नाही. मी केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील चिंतित आहे जे संरक्षण सेवेत येण्यासाठी खूप तयारी करत आहेत. "अग्निपथ योजनेबद्दल जाणून घेतल्यानंतर, मी सभ्य पद्धतीने विरोध करण्याचा निर्णय घेतला. नरेश मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यांनी केंद्राला अग्निपथ योजना मागे घेण्याची विनंती केली आहे.