Police Security at Mumbai BJP Office : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाची पोलीस सुरक्षा वाढवली - Minister Eknath Shinde
मुंबई : शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दिलेले सर्व प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावल्याने राज्यात बंडा अटळ असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला 54 आमदारांपैकी केवळ 14 आमदार उपस्थित ( 14 MLAs Present in Meeting ) असल्याने शिवसेनेच्या गटात खळबळ उडाली आहे.